मागे जा

लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मुलींना प्रोत्साहन व मार्गदर्शन शिबिर


महिलांवर व अल्पवयीन
मुलींवर होणाऱ्या
लैंगिक अत्याचाराच्या
घटनांबाबत जनजागृती
निर्माण व्हावी तसेच
मुलींना आत्मविश्वास
व धैर्य मिळावे यासाठी
विशेष जनजागृती शिबिर
आयोजित करण्यात आले.

कै. दिलीप आण्णासाहेब
लायकर चॅरिटेबल ट्रस्ट
तर्फे आयोजित या शिबिरात
लैंगिक अत्याचाराविरुद्ध
कायदेशीर हक्क,
स्वसंरक्षण, मानसिक
धैर्य व योग्य वेळी
तक्रार कशी करावी
याविषयी सविस्तर
मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरासाठी
अंडा. दिलशाद मुनावर
यांनी मार्गदर्शक म्हणून
उपस्थित महिला व
कुमारिकांना सखोल
माहिती दिली.
मोठ्या प्रमाणावर
महिला व मुलींचा
सहभाग या कार्यक्रमात
लक्षणीय ठरला.

हा उपक्रम म्हणजे
मुलींच्या सुरक्षिततेसाठी
आणि त्यांच्या सशक्त
भविष्यासाठी उचललेले
एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय