मागे जा

नागरिकांच्या आरोग्याची काळजी – डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया प्रतिबंध मोहीम


प्रभाग क्र. १३ अंतर्गत
नागरिकांच्या आरोग्याच्या
सुरक्षेसाठी डेंग्यू,
मलेरिया व चिकनगुनिया
यांसारख्या आजारांचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी
विशेष प्रतिबंधात्मक
मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत
नगरसेविका सौ. सायली
नितीन लायकर यांच्या
मार्गदर्शनाखाली
आरोग्य विभागाच्या
कर्मचाऱ्यांच्या
सहकार्याने संपूर्ण
भागामध्ये घराघरांमध्ये
जाऊन तपासणी करण्यात आली.

• घरांतील पाणी साठवण
तपासण्यात आली
• डासांची उत्पत्ती होणारी
ठिकाणे नष्ट करण्यात आली
• औषध फवारणी करण्यात आली
• परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत
नागरिकांना जनजागृती
करण्यात आली

या उपक्रमामुळे
नागरिकांमध्ये आरोग्याबाबत
जागरूकता वाढली असून
रोगप्रसार रोखण्यास
मदत झाली आहे.

— नगरसेविका सौ. सायली
नितीन लायकर

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय