मागे जा

सर्व सामान्य विद्यार्थ्यांसाठी लढा !


मराठा समाजाच्या वतीने
मराठा समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना
५० टक्के फी मध्ये सवलत मिळावी
या मागणीसाठी इचलकरंजी शहरात
ठोस व संघटित लढा उभारण्यात आला.

या उपक्रमांतर्गत
इचलकरंजी शहरातील सर्व शाळा,
कॉलेज व महाविद्यालयांमध्ये जाऊन
राज्य सरकारने पारित केलेले
परिपत्रक प्रत्यक्ष देण्यात आले.

या लढ्याचे नेतृत्व
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
यांनी केले.

यावेळी मराठा समाजातील
विद्यार्थी, पालक, युवक व कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर
आर्थिक बोजा पडू नये
आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला
न्याय मिळावा या हेतूने
हा लढा राबवण्यात आला.

विद्यार्थी हितासाठी
सदैव तत्पर राहण्याचा
निश्चय यावेळी करण्यात आला.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय