मागे जा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त
प्रभाग क्रमांक २६ मध्ये
कै. दिलीप अण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट
व सायली उद्योग समूह यांच्या माध्यमातून
सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

यानंतर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना
शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले.

या कार्यक्रमावेळी
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
स्थानिक नागरिक, पालक,
समाजसेवक व कार्यकर्त्यांनी
मोलाचे सहकार्य केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे
साहित्य, विचार व सामाजिक कार्य
नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा
हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय