प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत सामाजिक प्रश्नांसाठी
लोकशाही मार्गाने आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य
असून त्या अनुषंगाने विविध सामाजिक उपक्रम,
आंदोलने व जनजागृती कार्यक्रमांमध्ये
सक्रिय सहभाग घेण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी
मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी
नगरसेविका सौ. सायली नितीन लायकर
आणि युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
यांनी मराठा बांधवांसोबत सलग १४ दिवस
स्वतः उपोषण करून आंदोलनात सहभाग घेतला.
तसेच मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी
मुंबई येथे आझाद मैदानावर झालेल्या
सलग १४ दिवसांच्या उपोषण आंदोलनात
सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.
इचलकरंजी शहरातील 'वरणा पाणी योजना'
कृती समितीमार्फत राबविण्यात आलेल्या
चक्की उपोषणामध्ये सहभागी होऊन
नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी आवाज उठवण्यात आला.
यासोबतच दि. इचलकरंजी बार असोसिएशन
आणि इचलकरंजी शहरातील विविध संघटनांच्या
वतीने कोल्हापूर येथे काढण्यात आलेल्या
खडपी मोर्चामध्ये सहभाग घेऊन
न्याय मागण्यांसाठी ठाम भूमिका मांडण्यात आली.
या सर्व सामाजिक उपक्रमांमधून
सामाजिक न्याय, लोकहित व नागरिकांच्या
मूलभूत प्रश्नांसाठी सतत कार्यरत राहण्याचा
आमचा संकल्प अधोरेखित झाला आहे.