मागे जा

खासदार व आमदार फंडातून सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक्स बसविण्याचे काम


प्रभाग क्रमांक २६ मधील विकली मार्केट तसेच
कागवाडे मळा परिसरातील अंतर्गत रस्ते व मोकळ्या
जागांची अवस्था अतिशय खराब झाली होती.

या भागातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत
नगरसेविका सौ. सायली नितीन लायकर
आणि युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
यांनी खासदार व आमदार फंडातून निधी मंजूर करून
सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक्स बसविण्याचे काम हाती घेतले.

या कामाअंतर्गत विकली मार्केट परिसर,
कागवाडे मळा परिसर तसेच जोडरस्त्यांवर
नवीन पेव्हिंग ब्लॉक्स बसवून
परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.

या कामामुळे नागरिकांना चालण्यासाठी,
वाहनांसाठी सुरक्षित व सुबक रस्ते उपलब्ध झाले
तसेच परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडली.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय