मागे जा

PWD चा गोंधळ – रस्ता डांबरीकरणातील त्रुटी दुरुस्ती


PWD खात्यामार्फत दुरुस्त्यांत करण्यात येत असलेला
शिवतीर्थ ते संभाजी चौक ते चांदणी चौक हा रस्ता
योग्य प्रकारे डांबरीकरण न करता करण्यात आला होता.

या कामामध्ये साफसफाई न करता,
दुभाजकापासून २ ते ३ फूट जागा सोडून
फक्त ६ मीटर रुंदीचा अर्धवट डांबरीकरण
घाईघाईने करण्यात आले होते.

या चुकीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात
अडचणींना सामोरे जावे लागत होते.

ही बाब लक्षात आल्यानंतर
भागातील नगरसेविका सौ. सायली नितीन लायकर,
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
आणि स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडून
PWD खात्याच्या अभियंत्यांना ही चूक
प्रत्यक्ष जागेवर दाखवून दिली.

त्यानंतर संबंधित अभियंत्यांनी
चूक मान्य करून
८ मीटर रुंदीने नव्याने योग्य पद्धतीने
रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम
सुरू करण्यास मान्यता दिली.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय