मागे जा

सन्मान कार्याचा – स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०१८


इचलकरंजी शहर नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या
स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०१८ अंतर्गत
स्वच्छ शहर अभियान यशस्वी करण्यासाठी
नगरपरिषदेतील सर्व विभागांनी एकत्रितपणे
महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या अभियानामध्ये नगरपरिषदेचे सर्व स्वच्छता कर्मचारी,
आरोग्य विभाग, ड्रेनेज विभाग, मलेरिया विभाग,
तसेच बी. टी. जी. (घंटा गाडी) कचरा संकलन विभागातील
कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या
दृष्टीने कै. दिलीप अण्णासाहेब लायककर
चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून
सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना
एप्रन, हँडग्लोव्हज, मास्क व
गमबूटचे वाटप करून
त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सन्मान कार्यक्रमासाठी
नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर
आणि युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी विशेष पुढाकार घेतला.

या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा
आत्मसन्मान वाढून त्यांना सुरक्षित
व आरोग्यदायी वातावरणात काम
करण्यास प्रोत्साहन मिळाले.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय