प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत गटारींमध्ये
अनाधिकृत टपऱ्या, गाड्या व अडथळ्यांमुळे
गटारी साफ न होऊन पाणी साचणे,
कचरा अडकणे व दुर्गंधीची समस्या
वारंवार निर्माण होत होती.
ही समस्या दूर करण्यासाठी
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
आणि नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर
यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने
भागातील नागरिकांच्या सहकार्याने,
महापालिका कर्मचारी वर्ग व प्रशासन
यांच्या मदतीने गटार साफसफाईचे
काम हाती घेण्यात आले.
या अंतर्गत गटारातील घाण, कचरा काढून
नवीन नळ कनेक्शन, टेलिफोन कनेक्शन,
चेंबर कनेक्शन दुरुस्ती,
पाणी लिकेज थांबवणे व
संपूर्ण गटार साफसफाई करण्यात आली.
या कामामुळे पाणी साचण्याची समस्या,
दुर्गंधी व अस्वच्छता दूर होऊन
नागरिकांच्या आरोग्य व
दैनंदिन जीवनमानात
लक्षणीय सुधारणा झाली आहे.