मागे जा

सौंदर्यीकरण व स्वच्छता सुधारणा काम


प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत युवा नेते
मा. श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
आणि नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर
यांच्या सहकार्याने हत्ती चौक व बावणे गल्ली
या भागातील सौंदर्यीकरण व स्वच्छता सुधारणा
कामे हाती घेण्यात आली.

या अंतर्गत अतिरिक्त कचरा साठा व कचरा
कोंडाळे काढून टाकून परिसर स्वच्छ करण्यात आला.
हत्ती चौक येथे नागरिकांनी कचरा टाकू नये
यासाठी सूचना फलक लावण्यात आले.
तसेच साखरे हॉस्पिटल व जैन मंदिर परिसरात
असलेले कचरा कोंडाळे काढून नागरिकांना
बसण्यासाठी बाके व कुंड्या बसवून
परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले.

या कामामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व
नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर झाला असून
आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास
मदत झाली आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय