प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतादूत घंटा गाडीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
हा उपक्रम कै. दिलीप आण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने राबविण्यात आला.
या कार्यक्रमास श्री. नितीन दिलीप लायकर व सौ. सायली नितीन लायकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या घंटा गाडीच्या माध्यमातून प्रभागातील घराघरातून कचरा संकलन करून परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.